नमस्कार, मी अभिजीत राजेंद्र दगडे.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, समाजातील सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी आपुलकीने जोडले जाणे, हीच माझ्या जीवनाची खरी ओळख आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते माता-भगिनींपर्यंत प्रत्येकाच्या अडचणींमध्ये खंबीरपणे उभे राहणे आणि संकटात धावून जाणे, हेच मी माझे कर्तव्य मानतो.
गेल्या ८ ते १० वर्षांपासून बावधन, भुसारी कॉलनी आणि परिसरातील नागरिकांसाठी दिवस-रात्र एक करून काम करत आहे. माझ्या कामाची प्रेरणा ही केवळ राजकारण नसून, माणुसकी, जबाबदारी आणि समाजाप्रती असलेली निष्ठा आहे.
सर्व सामान्यांच्या पाठीशी राहून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी आपल्या प्रभाग क्र. १० मधून इच्छुक आहे. आपल्या सर्वांच्या अनमोल सहकार्यामुळेच विकासाचा मी प्रश्न सोडवू शकणार आहे आहे. निस्वार्थपणे काम करत असताना, आपण सर्वांनी आतापर्यंत मला लाखमोलाचे सहकार्य केले आहे असेच सहकार्य यापुढे देखील मला मिळावे हीच अपेक्षा
निवडणूक असो वा नसो, लोक आणि माझ्यातील नातं हे विश्वासाचं आणि आपुलकीचं आहे. आणि या नात्याच्या बळावर मी आज, उद्या आणि भविष्यातही लोकांसाठी, लोकांमध्ये आणि लोकांसोबत उभा राहीन.
धन्यवाद.